Tuesday, June 29, 2010

कांदा खेकडा भजी

साहित्य:

भजीचे पीठ:
२ कांदे - पातळ लांब काप
तिखट - १ चमचा
ओवा - १ चमचा
तेल - १ चमचा
मिरची - १ अगदी बारीक चिरून
कोथिंबीर - २ चमचे बारीक चिरून
मीठ - चवीपुरते
बेसन - साधारण २ मोठे चमचे

तळायला ३ वाट्या तेल

कॄती:
कांद्याचे पातळ काप करून घ्यावे. त्यात मीठ आणि तिखट घालून अर्धा तास बाजूला ठेवून द्यावे. मीठामुळे कांद्याला पाणी सुटेल. मग त्यात मिरची, कोथिंबीर, ओवा, तेल घालून, मावेल तितके बेसन घालावे. ह्या पीठात अजिबात पाणी घालायचे नाही.

एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करावे, तेल उकळले की त्यात कांदा-बेसन पीठ सोडावे. पीठामध्ये पाणी नसल्यामुळे खूप बेसन मावत नाही. त्यामुळे भजीचा आकार गोल होत नाही. भजी लालसर झाली की तेलातून काढून तेल निथळू द्यावे.

सॊस अथवा कोथिंबीर चटणी बरोबर ही भजी खायला द्यावी