Tuesday, June 29, 2010

कांदा खेकडा भजी

साहित्य:

भजीचे पीठ:
२ कांदे - पातळ लांब काप
तिखट - १ चमचा
ओवा - १ चमचा
तेल - १ चमचा
मिरची - १ अगदी बारीक चिरून
कोथिंबीर - २ चमचे बारीक चिरून
मीठ - चवीपुरते
बेसन - साधारण २ मोठे चमचे

तळायला ३ वाट्या तेल

कॄती:
कांद्याचे पातळ काप करून घ्यावे. त्यात मीठ आणि तिखट घालून अर्धा तास बाजूला ठेवून द्यावे. मीठामुळे कांद्याला पाणी सुटेल. मग त्यात मिरची, कोथिंबीर, ओवा, तेल घालून, मावेल तितके बेसन घालावे. ह्या पीठात अजिबात पाणी घालायचे नाही.

एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करावे, तेल उकळले की त्यात कांदा-बेसन पीठ सोडावे. पीठामध्ये पाणी नसल्यामुळे खूप बेसन मावत नाही. त्यामुळे भजीचा आकार गोल होत नाही. भजी लालसर झाली की तेलातून काढून तेल निथळू द्यावे.

सॊस अथवा कोथिंबीर चटणी बरोबर ही भजी खायला द्यावी

Monday, June 8, 2009

व्हेजिटेबल स्ट्यू

साहित्य:
भाज्या -
२ कप कॉलीफ्लॉवर तुरे
कप फरसबी - १ इंचाचे तुकडे
अर्धा कप वाटाणे
अर्धा कप मक्याचे दाणे
२ मध्यम ढबू मिरच्या चौकोनी तुकडे
१ मध्यम कांदा चौकोनी चिरून
१ कप ब्रोकोलीचे तुरे
२ गाजरे अर्ध्या इंचाचे तुकडे
तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही भाज्या

इतर -
व्हेजिटेबल ब्रॊथ - ३२ oz
डाइस्ड टोमॆटो कॆन - १४ oz
लसूण बारीक चिरुन - २ मोठे चमचे
ऒलिव्ह ऒइल - १ चमचा
मीठ, मिरी पूड, Crushed red pepper

कृती -
एका मोठ्या भांड्यात तेल गरम करुन, त्यात लसूण परतून घ्या
त्यात एकेक करून सगळ्या भाज्या टाका, आणि परतून घ्या
भाज्या थोड्या परतल्या गेल्या की त्यात टोमॆटो आणि व्हेजिटेबल ब्रॊथ घाला.
चवीपुरते मीठ, मिरी पूड, Crushed red pepper घाला आणि चांगले उकळू द्या

While serving garnish with coriander leaves and Serve with good hearty bread.